
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता अजय देवगण याला ढोंगी म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. अजय देवगण याच्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात त्याने बलात्काराचा आरोप झालेल्या आलोक नाथ यांच्यासोबत काम केल्याने तनुश्री भडकली असून तिने अजयला फटकारले आहे. ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोकनाथ हे अजय देवगण याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत.
मीटू या मोहिमेअंतर्गत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्री व इतर महिलांनी पुढे येत त्यांच्यावर झालेल्या अत्यांचारांना वाचा फोडली होती. त्यावेळी चित्रपट निर्माती विनता नंदा यांनी आलोकनाथ यांनी त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. मीटूची मोहिम सुरू असताना अजय देवगणने याबाबत ट्विट करत महिलांना सन्मान व त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच ज्या व्यक्तीने महिलांसोबत असे प्रकार केले आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही’, असे म्हटले होते.
मात्र अजय देवगण याच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोक नाथ यांची भूमिका आहे. त्यावरून तनुश्रीने त्याला फटकारले आहे. आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार तनुश्री म्हणाली, ”दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर येईपर्यंत कुणालाही माहित नव्हतं की आलोकनाथ या चित्रपटात काम करत आहेत. अजय देवगण व निर्मात्यांची इच्छा असती तर ते त्यांच्या जागी दुसऱ्या कुणालाही घेऊन पुन्हा शीट करू शकले असते. पण सिनेसृष्टीत खोटी व ढोंगी लोकं आहेत.






























































