तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनामाई फार्मा केमला आग

463

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. अनामाई फार्मा केम या कंपनीस दुपारी 3 वाजताच्या सुमारास आचानक आग लागली. यावेळी साधारणता 7-8 कामगार कामावर असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या आग आटोक्यात आली असून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. माञ लॉकडाऊनच्या काळात ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर या कंपनीत ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमत्तीपञातील उत्पादने न घेता वेगळीची प्रक्रिया केली जात असल्याने आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान तारापूर औद्योगिक क्षेत्रातील फार्मा, एपीआय व बल्क ड्रग्जचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांन व्यतीरिक्त ही अनेक कंपन्यांचालू असल्याने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी व स्थानिक प्रशासनाच्या समयन्वयाच्या अभावामुळे व जिल्हाधिकारी पालघर यांनी इतर विभागांना विश्वासात न घेता आनावश्यक उद्योगांना चालू ठेवण्यासाठी परवानगी दिल्याने आशा घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व गैर प्रकाराबाबत व आशा उद्योगांबाबत वारंवार माहिती व तक्रारी देऊन ही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या