राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींशी कार्यवाही करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापन केली आहे. शिक्षण आयुक्त हे टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशीनुसार टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरू असून याअंतर्गत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावर काम केले जाणार आहे. यासाठी 297 कार्ये (टास्क) अंतिम करण्यात आली आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी (आयुक्त) शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीत माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे सहसंचालक, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक, पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे विशेष अधिकारी आदींचा समावेश आहे.