टाटा मोटर्सची काझिरंगा एडिशन लाँच, वाचा काय आहे किंमत या जबरदस्त गाड्यांची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा मोटर्स या हिंदुस्थानातील आघाडीच्‍या कंपनीने हिंदुस्थानच्‍या संपन्‍न भौगोलिक व जैविक विविधतेमधून प्रेरित होऊन ‘एसयूव्‍हीची अनटेम्‍ड काझीरंगा एडिशन’ लाँच केली आहे. आजपासून या एडिशनच्या बुकींगला सुरूवात झाली आहे.

टाटा पंच काझीरंगा एडिशन, टाटा नेक्‍सॉन काझीरंगा एडिशन, टाटा हॅरियर काझीरंगा एडिशन, टाटा सफारी काझीरंगा एडिशन अशा चार एडिशन लाँच करण्यात आला आहे. टाटा पंच काझीरंगा एडिशनची किंमत 8,58,900 पासून पुढे आहे. टाटा नेक्‍सॉन काझीरंगा एडिशनची पेट्रोलची किंमत 11,78,900 तर डिझेलची किंमत 13,08,900 पासून पुढे असणार आहे. टाटा हॅरियर काझीरंगा एडिशनची किंमत 20,40,900 तर टाटा सफारी काझीरंगा एडिशनची किंमत 20,99,900 रुपये असणार आहे.