
विजेवरील वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून टाटा पॉवर राज्यभरात तब्बल 1500 चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्यापैकी 80 चार्जिंग स्टेशन महामार्गावर असणार आहेत.
सध्या टाटा पॉवरने पुणे-गोवा महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्गावर ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारली असून यासाठी पेट्रोल पंप्स, फूड प्लाझाची निवड केली आहे. राज्यातील सर्व प्रमुख नगरे व शहरांमध्ये टाटा पॉवर आधीपासूनच आपल्या सेवा पुरवत आहे. 2023मध्ये संपूर्ण महामार्गांवर दोन्ही बाजूंना दर 125 ते 150 किलोमीटर अंतरावर ईव्ही चार्जर्स बसवले जाणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाडय़ा वापरणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मराठमोळय़ा उत्सवाची परंपरा जपणारा गणेशोत्सव म्हणून काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाची ख्याती आहे. येथील ‘महागणपती’च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. अध्यक्ष अमरदीप गोसावी, कार्यवाह अनिल जाधव, खजिनदार अमित पार्टी आणि कार्याध्यक्ष प्रतीक राणे यांच्या नेतृत्वाखाली मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदाच्या महागणपतीचे मूर्तीकार आहेत सिद्धेश दिघोळे.

























































