
तौकते चक्रीवादळ शनिवारी रात्री सिंधुदुर्ग किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व मुख्यकार्यकारी अधिकारी प्रज्जीत नायर यांनी शनिवारी दुपारी मालवण किनारपट्टीची पाहणी करून मच्छिमार व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सावधतेच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान आपत्ती यंत्रणा व प्रशासनास सज्ज व सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, बांधकाम अभियंता नितीन दाणे, सहायक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, नगरसेवक पंकज सादये यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


























































