
आर्थिक वर्ष 2025-26 संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तत्पूर्वी तुमची आयकर फाईल क्लिअर ठेवणे गरजेचे आहे.
तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल, तर 31 मार्चपूर्वी ‘टॅक्स हार्वेस्टिंग’चा पर्याय निवडून तुम्ही तुमचा आयकर मोठय़ा प्रमाणात वाचवू शकता.
टॅक्स गेन हार्वेस्टिंग म्हणजे तुमच्या पोर्टपहलिओमधील शेअर्स किंवा म्युच्युअल फंड युनिट्सची अशा पद्धतीने विक्री करणे, ज्यामुळे तुमचे करदायित्व कमी होईल.
टॅक्स लॉस हार्वेस्टिंग: झालेला नफा ‘सेट-ऑफ’ करण्यासाठी तोटय़ातील शेअर्स विकून कर कमी करणेही यात समाविष्ट आहे. इंट्रा-डे व्यवहार यासाठी ग्राह्य नाहीत.
टॅक्स हार्वेस्टिंगसाठी शेअर्सची प्रत्यक्ष डिलिव्हरी होणे गरजेचे आहे. नियमांनुसार 1.25 लाख रुपयांपर्यंतचा नफा करमुक्त असल्याने, गुंतवणूकदारांनी योग्य नियोजन करावे.





























































