
उत्तर प्रदेश येथे लखीमपूर येथे एका 35 वर्षीय पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. कमी साखरेचा चहा दिल्यावरून दोघांमध्ये झालेल्या भांडणातून त्याने ही हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. बबलू पुमार असे या पतीचे नाव असून रेणी देवी असे मृत पत्नीचे नाव आहे. दोघांचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पत्नीने नेहमीच्या तुलनेत चहामध्ये साखर कमी टाकल्याने त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले, त्यात बबलुने रेणूचा गळा चिरला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.
























































