परभणीतील ब्राह्मणगाव शिवारात सापडला शिक्षकाचा मृतदेह

861

परभणी तालुक्यातील बाह्मणगाव शिवावारात एका शिक्षकाचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पूर्णा तालुक्यात शिक्षक असलेल्या या व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी सकाळी 11.30 वाजता पोलिसांना सापडला असून त्याची उत्तरीय तपासणी सुरु आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत पोलीस तपास सुरू आहे. विजय माधवराव कंधारे ( वय 38) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

विजय औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर येथील मुळचे रहिवाशी असून सध्या पूर्णा तालुक्यात शिक्षक असल्याचे सांगण्यात येते. ब्राह्मणगाव परिसरात एका केळीच्या मळ्यात मंगळवारी सकाळी गावकऱ्यांना त्यांचा मृतदेह दिसला. त्यांनी परभणी ग्रामीण पोलिसांना याबाबत कळविले. पोलीस उपनिरीक्षक गीते यांच्यासह जमादार सुभाष चव्हाण आणि सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले.

आपली प्रतिक्रिया द्या