शिक्षिकेच्या बदलीला पालकांचा विरोध; शाळेला ठोकले टाळे

553

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द वसाहत येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक उर्दू शाळेतील शिक्षिकेची बदली करण्यात आली. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा पालकांनी तीव्र शब्दात विरोध केला असून अधिकाऱ्यांचे सामंजस्य झुगारून शाळेला टाळे ठोकून संताप व्यक्त केला. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

उर्दू माध्यमाच्या शिक्षिका जैबा इनामदार यांची अचानक बदली करून त्या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शिक्षिका जैबा इनामदार यांच्या समर्थनार्थ पालकांनी विद्यार्थ्यांना उर्दूचे शिक्षणाला अडचण निर्माण होऊ शकते असा सवाल करून त्यांच्या बदलीचा विरोध केला. तर जोपर्यंत उर्दू माध्यमाचा शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. शिक्षिका जैबा इनामदार यांची अकारण बदली करण्यात आल्याने पालक वर्गाला जबर धक्का बसला आहे. अचानक बदली का करण्यात आली ? उर्दू माध्यमाच्या शाळेला मराठी माध्यमाचा शिक्षक का दिला? वारंवार पालकांकडून मागणी होत असताना प्रशासन दुर्लक्ष का करतय असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून या बदलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांची तडकाफडकी केल्याने पाल्यांचे भविष्याचे काय, गुणवत्तेवर होणारा विपरीत परिणाम यामुळे पालक आक्रमक झाले. त्यांनी थेट शाळेला टाळे ठोकले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसाळे, गट शिक्षण अधिकारी पोपट काळे ,केंद्रप्रमुख दिलीप ढेपले या अधिकाऱ्यांनी पालकांना समजावण्याचा प्रयत्न मात्र पालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यावेळी मुन्ना सय्यद, शब्बीर सय्यद ,जावेद पठाण, साजिद शेख, बिलाल सय्यद ,यासीन पठाण, मजहर शेख, अहमद शेख, वाशिम सैय्यद, राजू शेख, संकेत शेख, असिफ शेख, निजाम शेख, शौकत सय्यद, नजीर पठाण ,असलम सय्यद, तुळशीदास गुरसळ अदि पालक व महिला उपस्थित होत्या. या संपुर्ण प्रकरणावर शिक्षण विभाग काय निर्णय घेणार आणि कसा मार्ग काढणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या