सुट्टीतही शिक्षक ड्युटीवर

प्रबोधन कुर्ला शाळेने नवीन पायंडा पाडला आहे. उन्हाळी सुट्टी लागल्यानंतरही या शाळेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर आहे. पुढील शैक्षणिक वर्षातील उपक्रम व नियोजनाच्या तयारीसाठी शिक्षक  शाळेमध्ये उत्स्फूर्तपणे कर्तव्यावर येत आहेत.

प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ही मुंबईतील कुर्ला विभागातील अग्रगण्य शाळा आहे. दिवसेंदिवस मराठी माध्यमातील शाळांवर गंडांतर येत असताना या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे येथील संस्थाचालक व विश्वस्त  शलाका कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी घेत असलेली प्रचंड मेहनत. त्यामुळे शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्यानंतरही येथील शिक्षक पुढील शैक्षणिक वर्षातील उपक्रम व नियोजनाच्या तयारीत व्यस्त दिसत आहेत.