बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांचा सोमवारी संप

732

विविध मागण्यासाठी सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळातील सर्व शिक्षक एकदिवसीय संपावर जात आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील जिप शाळेत शुकशुकाट राहणार आहे. मेहकर तालुक्यातील जिप शिक्षक सोमवारी सकाळी 11 वाजता तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देणार आहेत.

जुनी पेंशन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करावी, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तात्काळ भरावी यासह इतर मागण्यांसाठी हा लाक्षणिक संप करण्यात आहे. जिल्ह्यातील सर्व जिप शिक्षक संपात सहभागी होत असल्याने सर्व शाळा बंद राहणार आहे. मेहकर तालुक्यातील जिप शिक्षक या संपात सहभागी होत असून महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीचे सदस्य तथा शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल धोंडगे, कास्ट्राईब शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.ए.मोरे व शिक्षक समीतीचे अध्यक्ष पुरूषोत्तम अकोटकर, माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी सर्व शिक्षकांना आवाहन केले की सर्व संपात सहभागी तालुक्यातील शिक्षकांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पं स मेहकर येथे जमावे, तेथून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी शांततेत या कार्यालयात जायचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या