IND Vs BAN – टीम इंडियाचा बांगलादेश दौरा एक वर्षांसाठी स्थगित, BCCI ने सांगितलं कारण

टीम इंडिया ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार होती. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार होती. परंतु आता BCCI ने मोठा निर्णय घेत टीम इंडियाचा बांगलादेश दौरा डिसेंबर 2026 पर्यंत स्थगित केला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि बीसीसीआयने सहमतीने दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाचा बांगलादेश दौरा 17 ते 31 ऑगस्ट दरम्यान होता. परंतु आता हा दौरा एक वर्षांसाठी स्थगित करण्यात आला आहे. BCCI ने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “दोन्ही क्रिकेट बोर्डाने चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. यामध्ये दोन्ही संघांचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि वेळापत्रक या सर्व गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत. बीसीबीने स्पष्ट केलं आहे की बीसीबी 2026 मध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश मालिकेसाठी उत्सुक आहे. या मालिकेच्या नवीन तारखा अधिकृतपणे नंतर घोषित करण्यात येतील.” अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.