सुपर ओव्हरचा डबल धमाका, टीम इंडियाने केला अफगाणिस्तानचा पराभव

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये प्रथमच डबल सुपर ओव्हर टायचा थरार अनुभवता आला. हिंदुस्थानने या डबल धमाक्यात अफगाणिस्तानचा 10 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयाची हॅटट्रिक साधली. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 17 धावांचे आव्हान दिले आणि हिंदुस्थानने सुपर टाय केली. मग दुसऱया सुपर ओव्हरमध्ये हिंदुस्थानने 12 धावांचे आव्हान अफगाणिस्तानला पेलले नाही.