अशी आहे टीम इंडियाची भगवी जर्सी, इंग्लडविरुद्ध दिसणार नवा लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

टीम इंडियाच्या जर्सीचा निळा रंग हा गेली वर्षोनुवर्षे आहे. मात्र या विश्व चषकात टीम इंडिया निळ्या सोबतच भगव्या जर्सीमध्ये खेळणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आज बीसीसीआयने या भगव्या जर्सीचा फोटो रिलीज केला आहे. भगव्या व निळ्या रंगाची ही जर्सी घालून टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.