
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी क्रिकेट संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत अपयशाचा सामना करावा लागला. ऑफस्पीनर मोईन अलीच्या प्रभावी फिरकी गोलंदाजीसमोर टीम इंडियाचा डाव ढेपाळत असतानाच हिंदुस्थानच्या रविचंद्रन अश्विनला मात्र आपला ठसा उमटवता आला नाही. याच पार्श्वभूमीवर आता हिंदुस्थानी क्रिकेट संघाला फिरकी गोलंदाजीचा प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती याबाबत निर्णय घेणार आहे. याचाच अर्थ आता रवी शास्त्राr यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये आणखी एक माणूस वाढणार आहे हे निश्चित झाले आहे.
पाचवा प्रशिक्षक कोण?
हिंदुस्थानी संघाला सध्या चार प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांच्यासह फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर व गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांचा समावेश आहे. आता या चौकडीत पाचव्या प्रशिक्षकाची भर होणार आहे, मात्र या पदावर कोणत्या व्यक्तीला स्थान मिळतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
आशिया कपआधी झाली बैठक
प्रशासकीय समितीचे विनोद राय व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांच्यामध्ये आशिया कपआधी बैठक झाली. इंग्लंडमधील झालेल्या अपयशानंतर टीम इंडियाला फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची गरज असल्याचे यावेळी रवी शास्त्राr यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता आगामी मालिकांमध्ये हिंदुस्थानी संघ फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकासह मैदानात उतरल्यास आश्चर्य वाटायला नको.




























































