iPhone 11 हिंदुस्थानात लॉन्च; किंमत किती?

4428

Apple ने आपली नवी iPhone 11 सिरीज हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन iPhone 11, iPhone 11 Pro आणि 11 Pro Max लॉन्च करण्यात आले आहे. iPhone 11 ड्युएल रियर कॅमेरासह तर, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max ट्रिपल रियर कॅमेरासह लॉन्च करण्यात आले आहे. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max यामधील फरक फक्त इतकाच आहे की, iPhone 11 Pro Max ची स्क्रीन iPhone 11 Pro च्या तुलनेत मोठी आहे. बाकी इतर फीचर्स या दोन्ही iPhone मध्ये एकसारखेच आहेत.

iPhone 11 Pro, 11 Pro Max – किंमत आणि उपलब्धता

iphone-11-renders-kaymak-1-1600x900

iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे तीन स्टोरेज ऑप्शनसह लॉन्च करण्यात आले आहेत. ज्यात  64GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचे ऑप्शन देण्यात आले आहे. iPhone 11 ची किंमत 64,900 रुपये इतकी आहे. तर iPhone 11 Pro ची प्रारंभिक किंमत 99,900 रुपये इतकी आहेत, तसेच iPhone 11 Pro Max ची प्रारंभिक किंमत 1,09,900 रुपये इतकी आहे. हिंदुस्थानात 27 सप्टेंबरपासून विक्रीसाठी हा नवीन iPhone उपलब्ध होणार आहे. हे दोन्ही iPhone midnight green आणि space gray, silver आणि gold या रंगाच्या पर्यायांसह उपलब्ध असतील.

iPhone 11 Pro, 11 Pro Max – फीचर्स 

5d307c91789d3e57c3770003-750-419

iPhone 11 Pro मध्ये  OLED चा 5.8 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, तर iPhone 11 Pro Max मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात iPhone 11 सारख्या A13 बायोनिक चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर सर्वात दमदार असल्याचा दावा ‘अँपल’ने केला आहे. iPhone 11 Pro और iPhone 11 Pro Max या दोन्ही फोनमध्ये डीप फ्यूजन कॅमेरा देण्यात आला आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत हे स्मार्टफोन अपग्रेड केलेल्या कॅमेरा फीचर्ससह लॉन्च केले आहे. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्येही आपल्याला 60Fps आणि 4K व्हिडिओ शूट करता येऊ शकतो.

iphone-11-phone

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा मेन कॅमरा देण्यात आला असून याचा ऍपर्चर f/1.8 आहे. या व्यतिरिक्त यात 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याचा ऍपर्चर  f/2.4 आहे. याचा में कॅमेरा Optical Image Stabilization (OIS) वर चालतो. यासोबतच यामध्ये एक तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे, जो 12 मेगापिक्सेलचा झूप कॅमेरा आहे. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे दोन्ही स्मार्टफोन 4X ऑप्टिकल झूम फीचर्सह देण्यात आले आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या