12 वर्षांची मुलगी गर्भवती राहिली, अल्पवयीन मुलासह 15 वर्षांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल

विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 12 वर्षांच्या एका मुलीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं. तिची तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांनी तपास केला आणि आणखी धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. पोलिसांनी या प्रकरणी 17 वर्षांच्या मुलाविरोधात आणि 15 वर्षांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात पीडित मुलीला 15 वर्षांच्या मुलीने तिच्या घरी बोलावले होते. घरी खेळायला ये असं सांगून तिने पीडित मुलीला बोलावले होते. ही मुलगी घरी गेली असता तिथे 17 वर्षांचा मुलगा आधीपासून होता. पीडित मुलगी घरी आल्यानंतर तिला घरी बोलावणारी मुलगी घरातून निघून गेली होती. यानंतर आरोपी मुलाने पीडितेवर बलात्कार केला.

फॅशन डिझायनरची उद्योगपतीविरोधात बलात्काराची तक्रार

मूळच्या दिल्लीच्या असणाऱ्या एका फॅशन डिझायनरने आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली आहे. ज्याच्याविरोधात तिने तक्रार नोंदवली आहे तो उद्योगपती असून तो आपला मित्र देखील आहे असं या फॅशन डिझायनरने म्हटलं आहे. पीडिता काही दिवस आरोपीच्या घरी राहण्यासाठी आली होती, यावेळी त्याने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप पीडितेने केला आहे. बुधवारी संध्याकाळी पीडितेने खार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडितेचं म्हणणं आहे की ती मुंबईला पहिल्यांदाच आली होती आणि तिच्या मित्राच्या घरी राहिली होती. यावेळी आरोपीने आपल्यावर बलात्कार केलाच शिवाय आपला शारीरिक छळही केला असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला आहे.