
अमेरिका आणि इराणमधील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर जमिनीवरून लष्करी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्यांदरम्यान, इराणच्या सरकारी मालकीच्या तेहरान टाइम्स (Tehran Times) या वृत्तपत्राने अमेरिकेला थरकाप उडवणारा इशारा दिला आहे. वृत्तपत्राने आपल्या पहिल्या पानावर अमेरिकन सैनिकांच्या फोटोंसह “Welcome to Hell” (नरकात तुमचे स्वागत आहे) असे शीर्षक देऊन थेट युद्धाचे आव्हान दिले आहे.
तेहरान टाइम्सने नरकात आपले स्वागत आहे, या मथळ्यासह अमेरिकी सैनिकांचा एक फोटो मुखपृष्ठावर छापला. त्यात पुढे असेही म्हटले आहे की, इराणी भूमीवर पाऊल ठेवणारा कोणताही अमेरिकी सैनिक केवळ शवपेटीतच परत जाईल.
दरम्यान, शुक्रवारी अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका मध्य-पूर्वेत १०,००० अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचा विचार करत आहे. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. या हालचालीमुळे वॉशिंग्टन इराणमध्ये संभाव्य भू-कारवाईची तयारी करत असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.
Special issue of the Tehran Times
Stay tuned for straight truth pic.twitter.com/GGXRGuFkMv
— Tehran Times (@TehranTimes79) March 27, 2026





























































