
‘तेजस’ हे स्वदेशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान असल्याचे बोलले जाते. या विमानांची निर्मिती हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी करते. सध्या प्रारंभिक रुपात असणाऱ्या या विमानाच्या निर्मितीला 350 कोटींचा खर्च येतो.
स्वदेशी बनावटीचे तेजस हे लढाऊ विमान बनवण्याचे काम स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या काळात सुरुवात झाली होती. सुरुवातीला याचे नाव ‘लाइट कॉम्बॅट एयरक्राफ्ट’ असे होते, मात्र दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या लढाऊ विमानाला ‘तेजस’ हे नाव दिले.
2016 मध्ये हे विमान इंडियन एअरफोर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आणि याच्या पहिल्या स्क्वाड्रनचे नाव ‘फ्लाईंग डॅगर्स’ ठेवण्यात आले. सध्या याचे मुख्य काम टेहळणी करणे असले तरी यात आवश्यक ते बदल करून याला अधिक घातक बनवण्याचे काम वेगाने सुरु आहे. तमिळनाडूच्या सुलूर येथे ही विमाने तैनात असून वायूदलाने 40 विमानांची ऑर्डर दिली आहे.
https://www.saamana.com/jaguar-fighter-jet-indian-ari-force-day/
वैशिष्ट्ये –
– हे विमान तशी 2,222 किलोमीटर वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे.
– एकाचवेळी 3,000 किलोमीटर अंतर पार करू शकते.
– तेजस विमान 43.4 फूट लांब आणि 14.9 फूट उंच असून याचे वजन 13,500 किलो आहे.
– या विमानावर 6 प्रकारची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तैनात केली जाऊ शकतात.























































