तेजस्विनीने मानले अन्नदात्यांचे आभार

दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांसमवेत अभिनेत्री तेजस्विनी पंडित नवरात्री स्पेशल फोटोशूट करत असते. यंदा आपल्या इलस्ट्रेशन फोटो सीरिजमधून तेजस्विनी कोरोनायोद्धय़ांना आदरांजली अर्पण करतेय. पहिल्या दिवशी डॉक्टरांना, दुसऱ्या दिवशी पोलिसांना आणि तिसऱ्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांना ट्रिब्यूट दिल्यावर तेजस्विनीने चौथ्या दिवशी शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली आहे.

पाठीवर बाळाला बांधून शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी आईचे रूप धारण करून जणू अन्नपूर्णा देवीच शेताच्या बांधावर राबत असल्याचा भास या फोटोतून होतो आहे. तेजस्विनी सांगते, नवरात्रीत अन्नपूर्णादेवीची आराधना करण्याची प्रथा आहे. आपल्यासाठी शेतात 365 दिवस राबणारी ही शेतकरी महिला अन्नपूर्णाच तर आहे. आपल्या तान्हुल्याला पाठीशी बांधून तिने काम केले नाही तर आपली कुठली पोटाची खळगी भरणार. त्यामुळेच आपल्यापर्यंत ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ पोहोचवणाऱ्या अन्नदात्याचे शतशः आभार!

आपली प्रतिक्रिया द्या