तेजस्विनीनेही बुक केले ऑलिम्पिकचे तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई नेमबाजी स्पर्धा

महाराष्ट्राची अव्वल नेमबाज तेजस्विनी सावंत हिने शनिवारी ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी ती हिंदुस्थानची बारावी नेमबाज ठरली.  14 व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीला महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पदकापर्यंत झेप घेता आली नसली तरी तिने पुढील वर्षी रंगणाऱया टोकियो  ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे  आणखी एक स्थान निश्चित केले. असे करणारी ती राही सरनोबतनंतर कोल्हापूरची दुसरी नेमबाज ठरली आहे.  अंतिम फेरीत मजल मारणाऱया आठपैकी पाच जणींनी याआधीच ऑलिम्पिकचे स्थान पक्के केल्यामुळे अन्य तीनपैकी एका स्थानावर हिंदुस्थानला मोहोर उमटवता आली. पात्रता फेरीत 1171 गुणांची कमाई करून पाचव्या स्थानासह तेजस्विनीने अंतिम फेरीत मजल मारली होती. तिला अखेर चौथे स्थान मिळाले.