श्रीशैलमच्या पॉवरप्लाँटमध्ये आग; नऊ जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात गुरुवारी मध्यरात्री अचानक आगीचा भडका उडाल्याने या प्रकल्पाच्या पॉवर हाऊसमध्येच भीषण आग लागली. या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 10 जणांना वाचविण्यात यश आले. रात्री आगीची घटना घडल्यानंतर एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. यावेळी प्लांटमध्ये 19 जण काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. राव यांनी या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश दिले आहेत.