
व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी टेलिग्राम सतत नवनवीन फीचर्स लाँच करत आहे. अलीकडेच आपल्या युजर्ससाठी कंपनीने चार नवीन फीचर्स समाविष्ट केली आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे डाऊनलोड मॅनेजर. या फीचरच्या मदतीने डाऊनलोड केलेली कोणतीही फाईल सहज शोधणे शक्य होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग या फीचरमुळे ओबीएस स्टुडिओ आणि एक्सस्प्लिट ब्रॉडकास्टसारख्या स्ट्रिमिंग टुल्सद्वारे लाईव्ह स्ट्रिमिंग करू शकाल. न्यू अटॅचमेंट या फीचरमुळे एकाचवेळी अनेक फाईल्स निवडून एका क्लिकवर सहज पाठवणे शक्य होणार आहे. तर लॉगिन फ्लो या फीचरचीदेखील पुनर्रचना करण्यात आली असून हे नवीन फीचर अॅण्ड्रॉईड इंटरफेस नाईट मोडमध्ये चालते. यात एक हलका पारदर्शक इफेक्टसुद्धा देण्यात आला आहे.



























































