
टेलिग्राम या मेसेजिंग ऍपवर चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधी व्हिडीओ पाठवून मोबदल्यात पैसा कमावणे पनवेलमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हा किळसवाणा गुन्हा करणाऱ्या पीयुष मोरे (23) या तरुणाला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफीसंबंधी बऱयाच चित्रफिती, व्हिडीओ, लिंक्स बेकायदेशीरपणे टेलिग्राम या प्लॅटफॉर्मवर वितरित होत असल्याचे नोडल सायबर पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केल्यावर चाईल्ड पोर्नोग्राफी करणारा आरोपी पनवेल येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पनवेल येथील उर्सली उचंबे मार्गावरील मोरया गार्डन रेसिडन्सीमध्ये राहणाऱया पीयुष मोरे या तरुणाला अटक केली. त्याचा मोबाईल जप्त करून तपासणी केली असता त्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचे अनेक व्हिडीओ तसेच त्याच्या बँक खात्यात अशा व्हिडीओच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारातील रोकड मिळून आली आहे.

























































