देवीच्या मंदिराचा कळस चोरणाऱ्या आरोपीस 2 तासात अटक, शिरूर पोलिसांची कारवाई

470

शिरूर येथील जागृत देवस्थान रेणुकामाता मंदिराचा कळस चोरून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह 2 तासात अटक केल्याची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

याबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार 6 ऑगस्ट रोजी रात्री 9.25 वा सुमारास शिरुर येथील जागृत रेणुकामाता मंदिराचा कळस चोरी झाल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तत्काळ पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पो कॉ राजेंद्र गोपाळे, पो.कॉ. संतोष साळुंखे ,पो कॉ गोरक्षनाथ शिंदे असे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. चोरी झाल्याची घटना खरी असल्याची माहीती त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक प्रविण खानापूरे यांना दिल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पाहचले. सदर ठिकाणी अनिल गायकवाड व नितीन गाजरे यांनी कळस घेऊन जाणाऱ्या आरोपीला हटकले होते व त्याचेकडे चौकशी केली होती. त्यांनी दिलेल्या त्या जुजबी माहितीवरून तपासाची चक्रे फिरवून कळस चोरून घेऊन जाणारा आरोपी प्रशांत आबा म्हस्के (रा. बाबुरावनगर शिरूर, ता. शिरूर जि. पुणे) हा असल्याचे निप्पन्न झाले. परंतु तो त्याच्या घरी सापडला नाही.

आरोपी हा चोरलेला कळस घेऊन परत रेणुकामाता मंदिराकडे येत असल्याची माहिती मिळाल्याने अनिल गायकवाड, नितीन गाजरे व पेालीस निरीक्षक प्रविण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पो. ना संजु जाधव ,पो. कॉ राजेंद्र गोपाळे, पो. को संतोष साळुंखे, पो. कॉ गोरक्षनाथ शिंदे, पो ह. संतोष साठे. पो. कॉ राहुल भागवत यांनी सर्वानी मिळुन आरोपीस अंदाजे 4 ते 5 किलो वजनाचा पंचधातुचा किंमत रुपये 20 हजारांच्या मुद्देमालासह पकडले. तो कळस मंदिरामध्ये ठेवण्यात आला. आरोपी विरुद्ध भादवि कलम 379 प्रमाणे शिरूर पेालीस स्टेशन येये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणला. शिरूर पोलीस व शिरूर मधील जागरूक नाकरिकांनी तात्काळ केलेल्या प्रयत्नामुळे सदरचा गुन्हा हा फक्त दोन तासामध्ये उघडकीस आला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या