
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशभरामध्ये गारठा वाढला असून बोचऱ्या वाऱ्याने नागरिकांना कुडकुडी भरली आहे. महाराष्ट्रातही काही भागात पारा थेट एका अंशापर्यंत खाली घसरला, तर जम्मू-कश्मीरच्या काही भागांमध्ये पारा मायनस वीस झाला आणि नळातून पडणारे पाणीही गोठले. आता ही झाली आपल्या देशातील गोष्ट परंतु जगात असेही काही ठिकाणं आहेत, जेथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. ही ठिकाणं कोणती आहेत पाहूया …
1. वोस्तोक, अंटार्कटिका –

रशियातील हे एक संशोधन केंद्र असून याची स्थापना 1957 साली करण्यात आली होती. अंटार्कटिक अभियानावर गेलेल्या रशियाच्या वोस्तोक या जहाजाच्या नावावरून संशोधन केंद्राचे नाव ठेवण्यात आले आहे. जगातील सर्वात थंड ठिकाण असून येथील तापमान -89.2 अंशांपर्यंत पोहोचते.
2. आइज़्मिट, ग्रीनलँड –

हा भाग आर्कटिकचा हिस्सा आहे. येथील तापमान वर्षभर कमी असते. येथील सर्वात कमी तापमान -74.2 अंशांपर्यंत पोहोचते.
3. वेरखोयस्क, रशिया –

जगातील सर्वात कमी तापमानाबाबत रशियातील वेरखोयस्क हे ठिकाण तिसऱ्या स्थानावर आहे. येथील तापमान -69.8 अंशांपर्यंत पोहोचते.
4. नॉर्थ आईस, ग्रीनलँड –

नॉर्थ ग्रीनलँडमधील हे ठिकाण एक संशोधन केंद्र आहे. या भागात वर्षभर बर्फ पडत असतो आणि हळूहळू वितळून याचे पाण्यात रुपांतर होते. या ठिकाणाचे सर्वात कमी तापमान -66.1 अंश झाले होते.
5. ओमय्याकोन, रशिया –

रशियातील या भागाला जगातील सर्वत दुर्गम आणि थंड जागांपैकी एक मानले जाते. या भागात 500 लोकांची वस्ती आहे. 1924 मध्ये येथील तापमान -71.2 अंशांपर्यंत गेले होते. तर 1933 मध्ये येथील तापमानाची -67.8 अंश नोंद करण्यात आली होती.
6. स्नॅग, युकोन –

जगातील सर्वात थंड ठिकाणांमध्ये युक्रेनच्या या प्रांताचे सहावा क्रमांक लागतो. येथील तापमान -63 अशांपर्यंत खाली घसरते. 1945 मध्ये येथील तापमान -65 अंशांपर्यंत पोहोचले होते.
7. फोर्ट सेल्किर्क, कॅनडा –

कॅनडातील हा भाग सर्वात थंड असून या भागाचे तापमान -59 अंशांपर्यंत खाली जाते. रक्त गोठवणाऱ्या या थंडीत लोकांना संपूर्ण संरक्षण कपड्यांसह जाणेही शक्य नाही.
8. माउंट मैकिनले, अलास्का –

उत्तर अमेरिकेतील या भागाला ‘डेनाली’ या नावानेही ओळखले जाते. मैकिनले नावाच्या पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून 20,310 फूट इतकी आहे. या भागात -50.7 अंश ताममानाची नोंद करण्यात आली आहे.
9. स्टेनली, इडाहो –

इडोहो या ठिकाणचे सध्याचे तापमान -57 च्या आसपास पोहोचल्याचे दिसते. 2010 ला झालेल्या जनगणनेनुसार या भागात फक्त 63 लोकं राहतात.
10. रोजर पास मोंटाना –

अमेरिकेच्या हेलेना राष्ट्रीय उद्यानात असणारे रोजर पास मोंटाना हे ठिकाण दहावे क्रमांकाचे थंड ठिकाण आहे. 1954 साली या ठिकाणचे तापमनाची -57 नोंद करण्यातर आली होती.




























































