
सामना ऑनलाईन । राजनंदगाव
छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झालले आहेत. जखमींना उपचारासाठी भलई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवरात्री उत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेतल्यानंतर परतत असताना हा अपघात झाला.
#Chhattisgarh: 9 members of a family who were returning to Bhilai from Dongargarh, killed in a road accident in Rajnandgaon, 3 people injured. pic.twitter.com/1OMx2Yb7zv
— ANI (@ANI) October 14, 2018
देवदर्शन करून हे कुटुंबीय घरी येत असताना ओव्हरटेक कताना समोरून येणाऱ्या ट्रकची आणि कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की 9 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला.





























































