पाकिस्तानच्या सैन्यावर दहशतवादी हल्ला ; 9 ठार, बलोच संघटनांनी घेतली जवाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानच्या सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 9 जण ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला आहे.

हा हल्ला तुर्बत आणि पंजगुर दरम्यान झाला. सौदीचा राजपुत्र मोहम्मद बिन सलमान हा पाकिस्तानभेटीवर येणार आहे. त्यापूर्वीच हा हल्ला झाला आहे.

बलुचिस्तानमधील पंजगुर मधील सीपेक मार्गावर हा हल्ला झाला आहे. बलुचिस्तान पोस्ट या वेबसाईटनुसार बलोच राजी अजोज संगर, बलोच प्रो फ्रीड ऑर्गनायझेशन, बलोच लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलोच रिपब्लिक गार्ड या संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.

वेबसाईटशी बोलताना बलोच राजी अजोइ संगर या संघटनेच म्होरक्या बलोच खान याने ही माहिती दिली की हा हल्ला आम्ही केला आहे. आमच्या लोकांचा ज्यांनी बळी घेतला हा त्याचा बदला आहे. चीन पाकिस्तानचा कुठलाच प्रकल्प इथे यशस्वी होणार नाही असे त्याने म्हटले. तसेच पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे ज्यांनी बलुच लोकांचा नरसंहार केला त्यांच्याशी अरबांनी व्यापार करू नये असेही खान याने नमूद केले.

नुकतंच हिंदुस्थानमध्ये जम्मू कश्मीर भागात पुलवामामध्ये एका दहशवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. हा हला जैश ए मोहम्मद या संघटनेने केला होता. या संघटनेला पाकिस्तानकडून पाठबळ मिळत होते. आता पाकिस्तानच्याच सैन्यावर हल्ला झाला आहे.