कश्मीरमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

402

महाशिवरात्रीच्या दिवशी जम्मू कश्मीरमध्ये जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सर्व पोलीस अधिकार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटना सुरक्षा दल आणि सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. सुरक्षा यंत्रणांनी सर्व पोलीस स्थानकांना ऍलर्ट केले आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत सर्व पोलीस अधिकार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीमेपलीकडे दशतवाद्यांच्या संयुक्त बैठकीत हा कट रचण्यात आला आहे. जैश आणि इतर संघटनाचे दशतवादी पठाणकोट, कठुआ आणि सांबा भागतून घुसखोरी करू शकतात. या हल्ल्यात जैशचे दहशतवादी स्थानिक दहशतवाद्यांची मदत घेऊ शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या