अफगाणिस्तानात कारागृहावर अतिरेकी हल्ला! 29 ठार, 50 पेक्षा जास्त जखमी

475

अफगाणिस्तानात कारागृहावर अतिरेकी हल्ला करण्यात आला. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर कारबॉम्बचा धमाका करून अतिरेकी आत घुसले. अतिरेक्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 29 जण ठार तर 50 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. ही चकमक तब्बल 18 तास चालू होती. या धुमश्चक्रीचा फायदा घेऊन कारागृहातून शेकडो कैदी पळाले. आपल्या काही सहकार्‍यांना सोडवण्यासाठी हा हल्ला केल्याचे ‘इसिस’ने म्हटले आहे.

अफगाणिस्तानच्या पूर्व नांगरहार प्रांतात जलालाबादच्या कारागृहात 1500 कैदी आहेत. यात बहुतांश दहशतवादी संघटनांचे कार्यकर्ते असून त्यातही बहुसंख्येने ‘इसिस’चे समर्थक आहेत. रविवारी एक भरधाव कार कारागृहाच्या प्रवेशद्वाराकर धडकली. कार धडकताच प्रचंड मोठा स्फोट झाला. याचा फायदा घेऊन गोळीबार करत अतिरेकी कारागृहात घुसले. तब्बल 18 तास स्थानिक पोलीस क अतिरेक्यांमध्ये चकमक चालू होती. यात तीन अतिरेक्यांचा खात्मा झाल्याची माहिती नांगरहार प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ता अताउल्लाह खोग्यानी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या