
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाची दोन मुख्य केंद्र बहावलपूर आणि नारोवाल येथे होती. ही केंद्र म्हणजे जैश-ए- मोहम्मदचे आत्मघातकी पथकं (फिदाईन) तयार करण्याची केंद्रे. त्यांचे संबंध पॅलेस्टाईनमधील हमासशी होते. अफगाणिस्तानातून तस्करी केलेली ‘नाटो’ची शस्त्रास्त तिथे साङ्गवली जायची. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विरुद्ध टोकावर असलेली ही दोन्ही केंद्रे बुधवारी पहाटे हिंदुस्थानच्या हवाई दलाने क्षेपणास्त्रांनी उडवली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर केंद्र 15 एकरांवर पसरलेले असून त्याचा केंद्र प्रमुख अब्दुल रौफ असगर होता. या भागात जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर आणि इतर कुटुंबातील सदस्यांची घरे आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हल्ल्यानंतर मसूद अझहरने कबूल केले की, बहावलपूरमधील संघटनेच्या मुख्यालयावर हिंदुस्थानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि चार साथीदार मृत्युमुखी पडले.
अफगाणिस्तानात नाटो सैन्याने सोडलेले शस्त्र आणि दारूगोळा साठवण्यासाठी बहावलपूर केंद्र सुप्रसिद्ध आहे. बहावलपूरमध्ये अफगाणिस्तानात लढणारे जैश-ए-मोहम्मद कमांडर वारंवार येतात आणि असगर खैबर पख्तूनख्वा येथील गुन्हेगारांच्या नेटवर्कद्वारे शस्त्रास्त्रs खरेदी करतात आणि त्यांची तस्करी करतात. या शस्त्रास्त्रांमध्ये एम 4 सीरिजच्या रायफलींचाही समावेश आहे.
नारोवार केंद्रात दहशतवाद्यांना घुसखोरीचे प्रशिक्षण
- नारोवारमधील केंद्राचा वापर पॅलेस्टाईन हमास गटाकडून दहशतवादी प्रशिक्षण देण्यासाङ्गी केला जातो. तिथे बोगद्यांमधील घुसखोरी, पॅराग्लायडिंग शिकवले जाते. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे हमास नेत्यांशी नियमित संवाद होत असतात.
- बहावलपूर आणि नारोवाल केंद्रातील फिदाईनींनी हिंदुस्थानात अनेक आत्मघातकी हल्ले केले. यामध्ये 2016 साली झालेला पङ्गाणकोट येथील हवाई तळावरील हल्ला आणि 2020 मध्ये नागरोटा येथील हल्ला यांचा समावेश आहे.
- ‘फिदाईन’ (आत्मघातकी) हल्ले करण्याचे शिक्षण देणाऱयांमध्ये मसूद अझहरचे जवळचे नातेवाईक, विशेषतः त्याचा पुतण्या तल्लाह रशीद, तसेच उस्मान, उमर आणि मोहम्मद इस्माईल, (ज्याला ‘लंबू’ असे म्हणतात.) यांचा समावेश होता. इथल्या केंद्रांवर शिक्षण दिल्यानंतर या लोकांना शस्त्र प्रशिक्षणासाठी बालाकोट येथे पाठवण्यात येते.