कश्मिरी पंडितावर दहशतवाद्यांचा गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Silhouette of soldier with rifle

कश्मिरी पंडितांच्या स्थलांतराचा मुद्दा चर्चेत असतानाच आज दहशतवाद्यांनी शोपियाँ जिल्ह्यात एका कश्मिरी पंडितावर गोळ्या झाडल्या. यात पंडित सोनूकुमार बलजी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांनी 24 तासांत चार हल्ले केल्यामुळे कश्मीर खोरे हादरून गेले आहे.

दक्षिण कश्मीरातील शोपियाँ जिल्ह्यातील चित्रगाम येथील रहिवाशी असलेल्या कश्मिरी पंडित सोनूकुमार बलजी याने पलायनाच्या वेळी कश्मीर सोडले नसल्याचे सांगितले जात आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांना तीन गोळ्या लागल्याने श्रीनगरमधील लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सोनूकुमार 30 वर्षांपासून कश्मीरात राहत आहे.

सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला

दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या मैसुमा येथील सीआरपीएफच्या कॅम्पवरही हल्ला केला. गोळीबारात एक जवान शहीद झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे.