
इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱया प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीने हिंदुस्थानात मराठी पाटीसह दमदार एण्ट्री केली आहे. टेस्लाच्या बीकेसी येथील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
टेस्लाच्या मुंबईतील या पहिल्या शोरूमच्या उद्घाटनावेळी ‘मॉडेल वाय’ ही कार हिंदुस्थानात लाँच करण्यात आली. ही कार अवघ्या 15 मिनिटांत चार्ज होते. एका चार्ंजगमध्ये कार 600 किमी अंतर कापू शकते. ही कार शून्य प्रदूषण करणारी असून तिचे सेफ्टी फीचर्स जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानले जातात. हिंदुस्थानात टेस्ला कंपनीची स्पर्धा बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रेंज रोव्हर या कंपन्यांशी असणार आहे.
जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीकडून महाराष्ट्र सरकारच्या नियमांचे पालन करण्यात आले असून पंपनीच्या शोरूमची पाटी चक्क मराठीत आहे. त्यामुळे टेस्लाचा हा मराठी बाणा सर्वांच्या काwतुकाचा विषय ठरला.