50 लाखांच्या ईव्ही कारसह टेस्लाची हिंदुस्थानात होणार एंट्री

प्रदूषणमुक्त इलेक्ट्रॉनिक व्हेईकल (ईव्ही) कारची मागणी वाढत आहे. ईव्ही कारच्या उत्पादनामध्ये अमेरिकन कंपनी टेस्ला आघाडीवर आहे. लवकरच टेस्लाचा हिंदुस्थानातील प्रवास सुरू होणार आहे. जुलै 2025 मध्ये टेस्लाची हिंदुस्थानात एंट्री होणार असल्याचे समजते. अद्याप कंपनीकडून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. चीनच्या फॅक्टरीतून टेस्लाने ‘मॉडेल वाय’ पहिली खेप हिंदुस्थानात पाठवली असल्याचे समजते. या कारची किंमत मूळ 27.7 लाख रुपये आहे. त्यावर अंदाजे 21 लाखांचे निर्यात शुल्क लावले जाईल. त्यामुळे ‘मॉडेल वाय’ची किंमत सुमारे 50 लाखांच्या आसपास जाईल. याच मॉडेलसह टेस्ला हिंदुस्थानच्या मार्केटमध्ये एंट्री घेणार असल्याची चर्चा आहे. कंपनीने सुपरचार्जर कंपोनंट, एक्सेसरिज, स्पेयर पार्टस्देखील निर्यात केले आहेत.