टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईव्ही वाहनांच्या संख्येत होणारी वाढ बघून आता अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांनीही मुंबईत टेस्ला ईव्ही या आपल्या कंपनीचे शोरूम उघडण्याचे ठरवले आहे. हिंदुस्थानातले हे टेस्लाचे पहिले शोरूम असून त्यानंतर नवी दिल्लीत दुसरे शोरूम उघडले जाणार आहे. टेस्लाचे मॉडेल वाय हे सध्या जगातील सर्वाधिक विक्री होणारे इलेक्ट्रिक वाहन आहे. टेस्लाने लाँचच्या तयारीसाठी अमेरिका, चीन आणि नेदरलँड्समधून सुपरचार्जरचे घटक, कार अॅक्सेसरिज आणि सुटे भागदेखील आयात केले आहेत.