
डीआरडीओकडून चंदिगडमध्ये विमान अपघातादरम्यान वैमानिकाला वाचवणाऱ्या स्वदेशी फायटर जेट एस्केप सिस्टमची चाचणी करण्यात आली. ही चाचणी डीआरडीओने अरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि एचएएलसोबत मिळून केली. रेल ट्रक रॉकेट स्लेड नावाच्या लांब रूळांच्या विशेष चाचणी ट्रकवर करण्यात आली. जिथे सिस्टमला जवळपास 800 किमी प्रति तास वेगाने नेण्यात आले. या चाचणीत तेजस विमानाचा पुढील भाग (फोरबॉडी) एका ट्रकवर बसवण्यात आला. रॉकेट मोटारींनी त्याला वेग दिला. आतमध्ये एक खास मानवी पुतळा (डमी) बसवण्यात आला होता. अशा चाचण्यांमधून हे कळते की, खऱया उड्डाणादरम्यान इजेक्शन सीट आणि वैमानिकाला वाचवणारे तंत्रज्ञान किती सुरक्षित व विश्वासार्ह आहे.

























































