टीईटी परीक्षा पुढे ढकलली; 31 ऑक्टोबरला परीक्षा; राज्यात 3 लाख 30 हजार नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत येत्या 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहीर केले असून आता 31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा पार पडणार आहे.

टीईटीसाठी राज्यात 3 लाख 30 हजार 642 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राज्यात 10 ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा होणार असल्याने टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱया उमेदवारांना येत्या काळात होणाऱया शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले आहे.

अकरावीच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज

मुंबईः  अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी उद्या बुधरार, 22 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. त्याचबरोबर बायपह्कल अभ्यासक्रमासाठीही पसंती दर्शविलेल्या विद्यार्थ्यांची विषयनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. अकरावी प्रवेशाच्या तीन सर्वसाधारण गुणवत्ता याद्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसऱया गुणवत्ता यादीमध्ये अर्ज केलेल्या 1 लाख 10 हजार 461 विद्यार्थ्यांपैकी 39 हजार 964 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून 70 हजार 497 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना विशेष यादीत प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.