जेन-झी तरुणींबद्दल विकृत वक्तव्य; टी. जी. मोहनदास पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीविरोधात जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणींबद्दल अत्यंत गलिच्छ व विकृत वक्तव्य करणारे हिंदुत्ववादी विश्लेषक टी. जी. मोहनदास यांच्यावर केरळ पोलिसांनी कारवाई केली आहे. मोहनदास यांना मतनचेरी येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

मोहनदास यांनी आपल्या यूटय़ूब चॅनेलवर बोलताना जंतरमंतरवरील आंदोलनावर विखारी टीका केली होती. ‘या आंदोलनामुळे गँगरेपसारख्या घटना घडू शकतात आणि तसे घडले तर कोणी तक्रारही करणार नाही. कारण, आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींना बलात्कार आवडतो. त्या मुली बलात्काराचा आनंद घेतात,’ असे मोहनदास बरळले होते. त्यांच्या वक्तव्यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात होता.

या प्रकरणी तक्रार आल्यानंतर थिरुवनंतपुरम पोलिसांच्या सायबर शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्या आधारे पोलिसांनी रविवारी चौकशीसाठी मोहनदास यांना ताब्यात घेतले. मोहनदास हे केरळ भाजपच्या बौद्धिक सेलचे माजी निमंत्रक आहेत. तसेच, आरएसएसशी संबंधित भारतीय विचार केंद्राचे माजी पदाधिकारी आहेत.