
विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी महाविकास आघाडीची एकजूट भक्कम असून ठाण्यात ठाकरे ब्रँडच मोठा भाऊ असेल, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले. ठाणे महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ द्या, ती समर्थपणे लढवू आणि जिंकू अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, लोकमान्यनगर प्रभाग क्रमांक १४ येथे शिवसेना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला शहर संघटक प्रमिला भांगे, विभागप्रमुख राजीव शिरोडकर, मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष (ओवळा-माजिवडा विधानसभा) पुष्कर विचारे, काँग्रेसचे हिंदुराव गळवे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रधान यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणारच, असा विश्वास व्यक्त केला. महिला आघाडी उपशहर संघटक रेखा पाटील, विभाग संघटक सुप्रिया गावकर, उपविभागप्रमुख वसंत शिंदे, संजय देवकर, नारायण भालेकर, मनसेचे राजेश बागवे, नीलेश चौधरी, अनिल माने, सौरभ नाईक, पवन पडवळ, राष्ट्रवादीचे प्रभाकर सावंत, अनिल फरांदे, संजीव घोडेकर, मुन्ना तिवारी, विश्वास चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.































































