ठाकरेचे शानदार म्युझिक लाँच, सोशल मीडियावर धूम… काही मिनिटांत लाखोंच्या हिटस्

1

सामना ऑनलाईन । मुंबई

ठाकरे म्हणजे वादळ, ठाकरे म्हणजे अंगार! ‘ठाकरे’ या नावातच ताकद आहे आणि तेच वादळ येत्या 25 जानेवारीपासून देशभरातच नव्हे, तर अवघ्या जगात घोंगावणार आहे, ‘ठाकरे’ सिनेमाच्या रूपाने. ‘आया रे, आया रे, सबका बाप रे… कहते है उसको ठाकरे’ अशी खणखणीत वर्दी देत हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आज या सिनेमातील गाण्यांचे शानदार लाँचिंग झाले तेव्हा पुन्हा एकदा धमन्यांतील रक्त सळसळले, अंगावर रोमांच उभे राहिले आणि मनगटाच्या नसा तटतटताना पायही नकळत थिरकले. गर्दीतून एकच आवाज घुमला… हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…! ठाकरे या नावातच ताकद आहे.

या चित्रपटातील गाणे शिवसेना भवनात ऐकवले होते; पण तेव्हाच मी सांगितले की, ‘ठाकरे’ सिनेमातील गाणे इतिहास घडवणार. स्टुडिओत गाण्याचे रेकॉर्डिंग जेव्हा सुरू होते तेव्हा मलाही ठेका धरावासा वाटत होता. पण मला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. – उद्धव ठाकरे

बाळासाहेबांसारखे दिसणे, बसणे, बोलणे, चालणे, वागणे तसे सोपे नव्हते. त्यांचे अनेक व्हिडीओ अनेकदा पाहिले. आयुष्यात मी स्वतःलाही इतके कधी पाहिले नव्हते जितके साहेबांना पाहिले. खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या जवळपास गेलो. – नवाजुद्दीन सिद्दिकी