
आधीच कोरोनाच्या संकटानंतर बिघडलेली अर्थव्यवस्था व नंतर देशात माजलेली अराजकता त्यामुळे श्रीलंकेची सध्या आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कटलेली आहे. तिला सावरण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी श्रीलंकेने हिंदुस्थानसह रशिया, चीन, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि जपान या सहा देशांतील पर्यटकांना व्हिसा मोफत देण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, श्रीलंकेपाठोपाठ आता थायलंडने हिंदुस्थान आणि तैवानच्या नागरिकांसाठी व्हिसाची असलेली अट रद्द केली आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानी पर्यटक 30 दिवस थायलंडमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात. या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्यात आली असून पुढच्या वर्षीच्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही सूट दिली जाणार आहे.




























































