‘थलपथी 67’ मुळे प्रेक्षकांचा 14 वर्षांचा वनवास संपणार, विजय आणि त्रिशा पुन्हा मुख्य भूमिकेत

तमिळ दिग्दर्शक लोकेश कनगराज याने थलपथी 67 चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेता विजय हा प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत अभिनेत्री त्रिशा ही प्रमुख भूमिकेत असणार आहे. 14 वर्षानंतर या दोघांची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, यामुळे सिनेरसिक खूश आहेत. या दोघांव्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त हा देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.