ठाण्यात बसपा नेते सुनिल खांबेंचा राडा, पोलिंग बूथमध्ये पोलिसांकडून अटक

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी 288 जागांवर मतदान पार पडले. जवळपास 9 कोटी मतदारांनी 3237 उमेदवारांचे भविष्य ईव्हीममध्ये कैद केले आहे. राज्यात सर्वत्र सुरळीत मतदान सुरू असताना ठाण्यामध्ये मात्र याला गालबोट लागले. ठाण्यात बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते सुनिल खांबे यांनी पोलिंग बूथमध्ये राडा घातल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली.

ठाण्यात दुपारच्या सुमारास मतदानासाठी आलेले बसपा नेते सुनिल खांबे यांनी EVM मशीन फोडून काळी शाई ओतून निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी ‘ईव्हीएम मुर्दाबाद’, ‘ईव्हीएम नही चलेंगा’ अशी घोषणा केली. यामुळे पोलिंग बूथवर एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी त्यांची उचलबांगडी करत पोलिंग बूथमध्ये त्यांना अटक केली. याची माहिती मिळताच बसपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या