ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात तृतीयपंथियांसाठी ‘स्पेशल वॉर्ड, राज्यातील पहिला प्रयोग; दहा बेडची स्वतंत्र व्यवस्था

असलेल्या ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात तृतीयपंथियांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. दहा बेडच्या या वॉर्डमध्ये तृतीयपंथियांना मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य विषयक सल्ला मिळणार असून गरजू रुग्णांवर शस्त्रक्रियादेखील करण्याचा निर्णय घेतला आहे. सिव्हिल रुग्णालयात तृतीयपंथियांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांना आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे.

ठाणे शहरातील जांभळी नाक्यावर 900 खाटांचे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन सुसज्ज इमारतींमध्ये जिल्ह्यातील गरजू व गोरगरीब रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. ठाणे जिल्हा व परिसरात असलेल्या तृतीयपंथियांना खासगी रुग्णालयांमध्ये सध्या जावे लागते. तेथे मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. त्याशिवाय तृतीयपंथीय आपली ओळख लपवत असल्याने त्यांना आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊनच सिव्हिल हॉस्पिटलच्या नव्या इमारतीमध्ये तृतीयपंथीय रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारली जात आहे.

आबिटकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत तृतीयपंथियांच्या स्पेशल वॉर्डला मंजुरी देण्यात आली. यावेळी सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
तृतीयपंथियांसाठी उभारण्यात येत असलेल्या स्पेशल वॉर्डची रचना ठरवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन या वॉर्डची रचना केली जाईल.

14 ऑपरेशन थिएटर्स
नव्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 14 सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स आहेत. त्याशिवाय तज्ज्ञ डॉ क्टरांचीही भरती करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीला 24 तास वीजपुरवठा मिळावा यासाठी रुग्णालयाच्या आवारातच स्वतंत्र सबस्टेशन महावितरण उभारणार आहे.