
दिव्यातील बेकायदा गोदामावरील नगरराईनंतर पालिकेने ठाण्याकडे मोर्चा वळवला आहे. बेकायदा बांधकामांच्या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आज महापालिकेत केला. त्यानंतर आयुक्तांनी नौपाडा, गंघापाडा, येऊर, घोडबंदर, कळवा, खारेगावसह विविध भागांतील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवणार असल्याचे संकेत दिले.
दिवा, शील येथील गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगीमुळे अनधिकृत गोदामांचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित झाला होता. त्यानुसार महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात भूमाफियांनी उभारलेल्या रसायन, टायर व भंगार साठवणुकीच्या २८० बेकायदा गोदामांचा उलगडा झाला. त्यापैकी १५२ गोदामांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली असून ११३ गोदामे सोमवारी जमीनदोस्त करण्यात आल्याचा दावा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केला.






























































