Thane news – दुकान मेडिकलचे, धंदा ड्रग्जचा; बाप-बेटीला अटक

दुकान मेडिकलचे, पण प्रत्यक्षात धंदा मात्र ड्रग्जचा करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब पालघर जिल्ह्याच्या कुडूस येथे उघडकीस आली आहे. हा गोरखधंदा करणारे मोहनलाल जोशी उर्फ शर्मा व त्यांची मुल गी निकिता या बाप-बेटीला पोलि सांनी अटक केली असून या घटनेमुळे पालघरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मोहनलाल जोशी यांनी आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये एमडी पावडरचा साठा ठेवला होता. ठाण्यातील मुंब्रा बायपास उड्डाणपुलाजवळ एमडी पावडर विकण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना लागताच सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून १ कोटी ६९ लाख रुपये किमतीची एमडी पावडर जप्त केली. त्यांना भिवंडीतील अतिक गोरे हा एमडीचा पुरवठा करायचा, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मोहनलाल यांना ड्रग्जच्या धंद्यामध्ये त्यांची मुलगी निकिताही मदत करायची. तिचे शिक्षण बी. फार्मपर्यंत झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.