
सिमेन्स वर्कर्स युनियनच्या ‘ऐक्य ट्रस्ट’च्या कामाची लायन्स क्लब तर्फे दखल घेण्यात आली असून सामाजिक कार्यासाठी सत्कार करण्यात आला.
सिमेन्स वर्कर्स युनियनच्या ‘ऐक्य ट्रस्ट’ संस्थेतर्फे जवळजवळ दोन दशके ठाणे महापालिका शाळांमध्ये तसेच रोटरीच्या माध्यमातून अजून दोन शाळांमध्ये संगणक प्रशिक्षणाचे कार्य सुरू आहे. या कामाची दखल घेत रविवारी 16 फेब्रुवारी रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. ऐक्य ट्रस्ट भविष्यात देखील अशीच वाटचाल करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

































































