ठाण्यात पशुविभाग सतर्क; बर्ड फ्लूसाठी सात विशेष पथके

वाघबीळजवळ मृतावस्थेत सापडलेल्या पाणबगळ्यांचा अहवाल आला असून ते एव्हिअन एन्फ्ल्यूएन्झा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ त्यांना बर्ड फ्लू झाल्याचा अहवाल आला असून त्या पार्श्वभूमीवर जिह्याची पशुवैद्यकीय यंत्रणा सतर्प झाली आहे. कोंबड्या किंवा इतर पक्ष्यांच्या मरतुकीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या रोगांची तपासणी करण्यासाठी ठाणे जिह्यात सात पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. दिवसातून दोन वेळा कोंबड्यांसह पाळीव पशुपक्ष्यांच्या हालचालींवर या पथकांचा वॉच असेल.

रायगडकरांनो… बिनधास्त चिकन, अंडी खा!

रायगड जिह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नसून नागरिकांनी अंडी, चिकन बिनधास्तपणे खायला हरकत नाही. त्यामुळे कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुभाष म्हस्के यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या