
झोपेच्या 45 गोळ्या खाऊन डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या डॉक्टरचे गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र नर्सने लग्नाचा तगादा लावला होता. डॉक्टरने नकार दिल्याने तिने बोलणे बंद केले होते. त्यानंतर डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलले.
डोंबिवलीतील डॉक्टरचे नर्ससोबत प्रेमप्रकरण असल्याचे पत्नीला समजले. त्यापासून त्यांची नेहमी भांडणे होत होती. घरगुती वाद वाढल्याने डॉक्टरने डोंबिवली पूर्वेतील एका उच्चभ्रू सोसायटीत स्वतंत्र घर घेतले आणि तेथे राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, नर्सने डॉक्टराकडे लग्नाचा तगादा लावला. या नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी बीयरसोबत झोपेच्या 45 गोळ्या घेतल्या.



























































